सिंदेवाही सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचा कबड्डीत विजय – जिल्हास्तरावर संघाची निवड
सिंदेवाही (दि. २९ ऑगस्ट २०२५)
सिंदेवाही तालुक्यातील टेकरी येथे सुरू असलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या कबड्डी प्रकारात सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाहीचा संघ विजेता ठरला.
अंतिम सामन्यात सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाने श्री ज्ञानेश कनिष्ठ महाविद्यालयावर विजय मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी खेळाडू :
अंशुल बोरकर, सुजल मोहुर्ले, सागर कांबळे, शिवम सावसागडे, रोशन शेंडे, रितिक गावतुरे, भरत मेश्राम, प्रज्वला आडे, तन्मय खोब्रागडे, कुणाल जीवतोडे, कार्तिक गुरूनुले, सुमित मांदाडे.
या विजयाबद्दल विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेंद्र जयस्वाल, सचिव श्री. अरविंद जयस्वाल, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य केंकरे सर, पर्यवेक्षक सुकारे सर, मार्गदर्शक प्रा. खुणे सर तसेच सर्व शिक्षकांनी विजयी संघाचे कौतुक करून अभिनंदन केले.
जिल्हास्तरावरही सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ आपली विजयी परंपरा कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
