सिंदेवाही (ता. चंद्रपूर) :
सिंदेवाही तालुक्यातील देलणवाडी येथील मंगला मंगेश आनंदे (वय ४०) या महिलेचा सापदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. चिखलमिनघरी येथील शेतात दुसऱ्याकडे मजुरी करत असताना दिनांक ६ सप्टेंबर, शनिवार रोजी विषारी सापाने तिच्या हाताला चावा घेतला. चाव्यानंतर तिची प्रकृती झपाट्याने खालावल्याने तिला तातडीने सामान्य रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मंगला हिच्या पाठी एक मुलगी असून, तिच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. देलणवाडी, चिखल मिनघरी या आसपासच्या गावांत या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी सुरक्षिततेसंबंधी अधिक जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना शेतात काम करताना काळजी घेण्याचे आणि साप चावल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. सिंदेवाही पोलीस प्रशासनाने घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
रोशन खानकुरे चंद्रपूर 8888203020
