विधीमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांचे नेतृत्व मान्य नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर ब्रम्हपुरीचे राजकीय चित्र झपाट्याने बदलत असून, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल होऊ लागले आहेत. ब्रम्हपूरी शहरातील विविध भागांमधून सुरू आहे असलेली ही पक्ष प्रवेशाची मालिका कायम सुरूच आहे.गेल्या दहा वर्षांत विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या व्यापक विकासकामांमुळे, तसेच नागरिकांशी थेट आणि सुसंवादी जनसंपर्कामुळे जनतेचा काँग्रेसबद्दलचा जनविश्वास अधिक दृढ झाला आहे. मूलभूत सुविधांचा विस्तार, शिक्षण–आरोग्य–क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण काम, नव्या शासकीय इमारती, जलतरण तलाव अशा प्रगतीशील उपक्रमांमुळे शहरातील सर्व समाजघटक काँग्रेसच्या कार्यपद्धतीकडे आकर्षित झाले आहेत.याच विश्वासाने प्रेरित होऊन भाजप आणि इतर पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी ब्रम्हपूरी येथील कमलाई निवासस्थानी विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक, महिला, युवक आणि विविध समाजघटकांतील शेकडो कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे ब्रम्हपुरीत नव्या राजकीय शक्तीची उभारणी झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि विकासाची वाटचाल अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक सतीश हुमने, सारंग बनपुरकर, पंकज उरकुडे, जयश्री कुथे, ज्योती राऊत, समीर वैरागडे, शशिकांत मातेरे, वैशाली सामृतवार, कल्पना ठेंगरी, पपीता कुथे, वैशाली माकडे, मंजूषा दुपारे, सुलभा सहारे, कांचन बर्डे, विना घोडपागे, जया वंजारी, हिमांशू राऊत, महेश ठाकरे, राकेश नवलाखे, भुषण राउत, सरीता दुपारे, सुरेखा मेश्राम, प्रमिला सहारे, मिरा मेश्राम, नलीनी दुपारे, ज्योती वनस्कार, रेखा विधाते, कांता शेंडे, विलास बगमारे, विजय बगमारे, दिनेश दुपारे, अतुल दुपारे, चेतन पगाडे, रोशन नाकतोडे, केशव नवलाखे, गौरी समर्थ, सुषमा समर्थ, शालू येळणे, राजेंद्र महाजन, संजय समर्थ, राहुल ठेंगरी, अरुण चौधरी, रोषण सहारे, अनुष मेश्राम, सम्यक सोंडवले, राजू कुथे, मिथून चहांदे, रोषण कोडापे, मनोज डांगे, ओम समर्थ, करण धोटे, चिन्मय ठेंगरे, वंश बरडे, चयन आत्राम, सिध्दांत सावकार, लक्की सय्यद, ज्योती राऊत, ललीता सहारे, कविता वाहारे, रूमा बरडे, विद्या चौधरी, संजना सहारे, चंद्रभागा ठेंगरी, रंजना भरणे, कोमल सहारे, रिया सावकार, निशा वानखेडे, अनुराधा दूबे, शेवंता वाहारे, कल्याणी कावळे, वनिता भरणे, उर्मिला सहारे, आलोक राऊत, आकाश राऊत, विनय जिवतोडे, किशोर वानखेडे, अलतमस्त सय्यद यांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
