• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

अन्यायाला कंटाळून शेतकऱ्याचा मृत्यू — तहसील प्रशासनावर संतापाचा भडका

ByRoshan Khankure

Oct 8, 2025
Spread the love

“न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करावी.”
दरम्यान, ग्रामस्थांनी आरोप केला की, विष प्राशनानंतर घटनास्थळी असलेली विषाची बाटली आणि इतर पुरावे तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ करून नष्ट केले. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेची विभागीय चौकशी सुरू असून, अंतिम अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र शेतकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, दोषींना शिक्षा न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.
शेतकरी परमेश्वर मेश्राम यांचा मृत्यू हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून, तो शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधातील आक्रोशाचे प्रतीक बनला आहे. न्यायालयाचा आदेश झुगारून केलेली प्रशासनाची टाळाटाळ आणि निष्क्रियता — यामुळे शेतकरी वर्गाचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *