चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेले पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या क्षेत्रात नवे मानदंड निर्माण केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी प्रकरणांवर केलेली जलद, प्रभावी आणि निर्भीड कारवाई संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. ड्रग्स, अवैध दारू, खून, चोरी, सायबर गुन्हे, महिला अत्याचार अशा गंभीर प्रकरणांवर त्यांनी दाखवलेली तत्परता उल्लेखनीय ठरली आहे.कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि जनतेशी असलेली आपुलकी या गुणांमुळे साहेबांनी चंद्रपूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यात गौरवाने उजळवले आहे. सण-उत्सव असो वा बंदोबस्ताची वेळ — ते नेहमी अग्रभागी राहून जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालतात. त्यांच्या नेतृत्वामुळे आज चंद्रपूर जिल्हा शांत, सुरक्षित आणि गुन्हेमुक्ततेकडे वाटचाल करणारा जिल्हा ठरला आहे, ही प्रत्येक नागरिकाची अभिमानाची बाब आहे. “जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहणाऱ्या या कर्तव्यदक्ष नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” शुभेच्छुक — सिंदेवाही की आवाज (YouTube न्यूज चॅनल) व वंदे फर्स्ट विदर्भ न्यूजवेब पोर्टल
