तर राहा सावधान!दीपावली निमित्त सायबर सुरक्षा जनजागृती संदेशदिवाळीसाठी ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढत असतांना ऑनलाईन सायबर भामटेही सक्रिय झाले आहेत. फेस्टीवलच्या विविध ऑफरच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचाही “सेल मोड” ही ऑन झालेला आहे. बनावट ई-कॉमर्स वेबसाईट, फेक कुपन कोड्स, क्युआर स्कॅम, रिवार्डस पॉईन्ट कॅशबॅक ईत्यादिच्या नावाखालील डेटा चोरणारे अॅप्स झपाटयाने वाढत आहेत.माहे ऑक्टोंबर, २०२५ हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरुकता म्हणुन पाळला जात असुन या महिण्यात श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळया शाळा, महाविद्यालय व ईतर शैक्षणिक ठिकाणसह वेस्टर्न कोल्ड फिल्डस लि. च्या वेगवेगळया एरीया मधील कार्यालयात नागरीकांना सायबर स्वच्छता, ऑनलाईन फसवणुक प्रतिबंध आणि सुरक्षित डिजीटल पध्दतीबद्दल व्यावहारीक ज्ञान देऊन सक्षम करण्याचे उद्देशाने सतत सायबर जनजागृती कार्यक्रम घेणे सुरु आहे.सध्या दिवाळी सणा निमित्त बरेच नागरीकांचा वेगवेगळया गावात / शहरातुन आवागमन सुरु आहे. त्यातच सुट्ट्याचा कालावधीत असल्याने बैंक सुध्दा बंद असल्याने सायबर गुन्हेगारांकडुन याच वेळी नागरीकांना वेगवेगळया फसव्या कॉल करुन त्यांची आर्थीक हाणी होण्याची शक्यता पाहता श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या संकल्पनेने आज रोजी चंद्रपूर बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन चंद्रपूर येथे सायबर पोलीस स्टेशनचे पथक पाठवुन प्रवाश्यांनी देखील दीपावली निमित्त सायबर सुरक्षा जनजागृती संदेश देण्यात येवुन पॉम्पलेट वाटप करुन सुरक्षित ऑनलाईन व्यवहार, दिपावलीतही डिजीटल सजगत ठेवण्याबाबत प्रवाश्यांमध्ये जनजागृती करण्यात आली असुन नागरीकांनी खात्यातुन पैसे गेल्याचे समजताच शक्य तितक्या लवकर सायबर हेल्पलाईन वर संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात शक्यतो लवकरात लवकर १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा cybercrime.gov.in यावर ऑनलाईन रिपोर्ट करावा. तसेच मोबाईल हरविल्यास ceir.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाईन रिपोर्ट करण्याबाबत माहिती देवुन सायबर गुन्हयापासुन सुरक्षिततेचे उपाय योजना बाबत जनजागृती करण्यात आली
