एकुण ०२ पिस्टल, ०२ कटटे, ०४ खंजर, ०१ वाहन, ०२ चारचाकी वाहन, मोबाईल वव इतर साहित्य असा एकुण १७,४५,०००/- रु.चा माल जप्तपोलीस स्टेशन चंद्रपूर शहर ची कारवाईदिनांक २०/१०/२०२५ रोजी पो.स्टे. चंद्रपूर शहर पोलीसांना गोपनिय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे छोटु सुर्यवंशी हा आपल्या साथीदारासह काळया रंगाच्या डस्टर कारने दादामिया ट्रॉन्सपोर्ट गॅरेज समोरील मोकळी जागा, गंजवार्ड चंद्रपूर येथे देशी कट्टा घेवुन येणार आहे. अशा खात्रीशिर माहितीवरुन पोस्टे चंद्रपूर शहर येथील पोलीस निरीक्षक हे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पंचासह सदर ठिकाणी सापळा रचुन सदर ठिकाणी उभ्या असलेल्या काळया रंगाचे डस्टर वाहनाजवळ उभे असलेल्या पैकी ४ इसमांना शिताफीने ताब्यात घेवुन सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात ०२ माऊझर गन अक्तीशस्त्र (पिस्टल), ०२ देशी कटट्टे, ३५ नग जिवंत काडतुस, तसेच ०४ लोखंडी धारदार खंजर असे घातक हत्यार मिळुन आल्याने सदर आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक ७५८/२०२५ कलम ३, ४/२५ भारतीय हत्यार कायदा आणि कलम ३१० (४) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीतांच्या ताब्यातील वरील अग्नीशस्त्रे व हत्यारसह एक दुचाकी, दोन चारचाकी वाहन, ०४ नग मोबाईल व इतर साहित्या असा एकुण १६,४५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार चंद्रपूर शहर पोनि श्री निशीकांत रामटेके यांचे नेतृत्वात सपोनि श्री राजेंद्र सोनवणे, पोउपनि श्री दत्तात्रय कोलटे, श्री विलास निकोडे, पोहवा लक्ष्मण रामटेके, संजयधोटे, इमरान शेख, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिध्दीकी, भावना रामटेके, कपुरचंद खैरवार, रुपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदुरकर, विक्रम मेश्राम, प्रफुल्ल भैसारे, दिपीका झिंगरे, सारीका गौरकार सर्व पोस्टे चंद्रपूर शहर यांनी केली आहे.
