दिनांक 13/10/2025 रोजी रात्री ब्रह्मपुरी शहरातील रेल्वे स्टेशन जवळील पेठ वार्ड परिसरात एकाच रात्री घरफोडी करून चोरी केल्याबाबत पोलीस स्टेशन ब्रह्मपुरीमध्ये दोन गुन्हे नोंदवले गेले होते.पहिल्या घटनेत, धनीराम नकटूची मेश्राम (वय 71, रा. पेटवार्ड) यांचे घराचे दरवाजे तोडून सोन्याचे कानातले (3 ग्रॅम, रु. 23,000) व नोकिया कंपनीचा कीपॅड मोबाईल (रु. 1,000) चोरी करण्यात आले. दुसऱ्या घटनेत, सोहेल नूरखान पठाण (वय 32, रा. पेठ वार्ड) यांच्या बांधकामाधीन घरात रात्री झोपलेल्या फिर्यादींकडून Realme GT8 (रु. 30,000) व IQOO मोबाईल (रु. 10,000) चोरी झाला.
पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव व पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनेरी मनोज खडसे व टीमने संशयित आरोपींचा शोध सुरू केला.
तत्पर कारवाईत, रेल्वे स्टेशन परिसरातून आरोपी श्रीकांत उर्फ ‘बोटतुट्या’ राजू जुनारकर (वय 22, रा. चंद्रपूर) पकडला गेला. त्याच्या कडून एकूण 63,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल हस्तगत करण्यात आले. आरोपीस नोंदवलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोहवा मुकेश गजबे व पोहवा अजय कटाईत करत आहेत.

