• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणाऱ्या तिन आरोपी ताब्यात

ByRoshan Khankure

Oct 15, 2025
Oplus_0
Spread the love

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कामगिरी

दिनांक १५ ऑक्टोंबर, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस स्टेशन नागभीड हद्दीत मौजा कोटगांव येथे नाकाबंदी करुन गडचिरोली वरुन नागपूर कडे जाणारा ट्रक क्रमांक MH40-CT-2154 ला थांबवून पंचासमक्ष ट्रकची पाहणी केली असता त्यात एकुण १६ नग जनावरे (म्हैस व रेडे) किंमत ६,४०,०००/- रुपयाचा माल अवैध रित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने सदर १६ नग जनावरे आणि वाहतुकीस वापरलेला वरील नमुद ट्रक किं, २०,००,०००/- असा एकुण २६,४०,०००/- रुपयाचा माल जप्त करुन आरोपी नामे (१) फिराजे खान (चालक) (२) आझाद खान दोन्ही रा. भिमगड कॉलनी वार्ड १६ छपरा जि. शिवनी (मध्यप्रदेश) (३) सुनिल झेरेशिया रा. गोटाटोला ता. छुरीया जि. राजनांदगाव (छत्तीसगड) व (४) जमीर कुरेश रा. नागपूर (पाहिजे असलेला आरोपी) यांचेविरुध्द पोलीस स्टेशन नागभीड येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा रजनीकांत पुठठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इमरान खान, पोअं / किशोर वाकाटे, पोअं/ हिरालाल गुप्ता, पोअं / शंशाक बदामवार, चापोअं/रुषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *