• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

अंतरगावात जनतेच्या सेवेसाठी नवी पायरी — आमदार वडेट्टीवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत भवन व सभागृह उद्घाटन”

ByRoshan Khankure

Oct 17, 2025
Oplus_131072
Spread the love

“गावांचा विकास म्हणजे फक्त रस्ते वा इमारती नव्हे, तर जनतेच्या जीवनमानात होणारा बदल हा खरा विकास आहे. सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येक गावाला पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य आहे. जनतेच्या हितासाठी मी सत्तेत असो वा विरोधी बाकावर, माझा आवाज नेहमी बुलंद राहील.”

त्यांनी पुढे सांगितले की, शासनाच्या विविध योजनांद्वारे ग्रामीण भागात विकासाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच आणखी काही सुविधा अंतरगावात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याला सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे, गटविकास अधिकारी श्री. मोरे, सिंदेवाही शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, श्री. पोरेड्डीवार, माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, अभिजीत मुप्पिडवार, महेश मंडलवार, सरपंच दीपाली ढाले, ग्रामपंचायत सदस्य, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार वडेट्टीवार यांचा सत्कार करून गावाच्या विकासासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. गावातील नागरिकांनीही नव्या इमारतींच्या लोकार्पणाने गावाला मिळालेली अभिमानास्पद ओळख व्यक्त करत आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून, पुढील काळात गावातील विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने व “जय महाराष्ट्र” च्या घोषात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *