• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

पूरग्रस्त मराठवाड्यासाठी नागभीडचा दानवीर उपक्रम — ‘आपले सरकार सेवा केंद्र चालक संघटने’चा मदतीचा हात

ByRoshan Khankure

Oct 8, 2025
Spread the love

पूरग्रस्त मराठवाड्यासाठी नागभीडचा दानवीर उपक्रम — ‘आपले सरकार सेवा केंद्र चालक संघटने’चा मदतीचा हात

नागभीड पूरग्रस्त मराठवाडा येथील बांधवांच्या मदतीसाठी नागभीड तालुक्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्र चालक संघटना’ पुढे सरसावली आहे. सामाजिक बांधिलकी जपत, ही संघटना आज दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी (पूरग्रस्त मराठवाडा) करीता आर्थिक मदत मा. तहसीलदार प्रताप वाघमारे, नागभीड यांच्या हस्ते सुपूर्द केली.
या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः राजू सहारे, संदीप मसराम, पपील देशमुख, सुबोध गेडाम, दिनेश कोठेवार, भूषण चावरे, रवी खोब्रागडे यांचा सहभाग मोलाचा ठरला. तसेच नागभीड तालुक्यातील अनेक सेवा केंद्र चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पूरग्रस्त बांधवांसाठी आपली मदत दिली.
संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले:

“पूरग्रस्त मराठवाड्यातील बांधवांवरील संकटात आपण एकजुटीने उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने शक्य तेवढी मदत करावी, हीच आमची अपेक्षा आहे.”
मा. तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत संघटनेचे आभार मानले आणि पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरेल असे सांगितले.
चिंधीचक ग्रामपंचायत तसेच पाटोपाट तरंगिनी रास गरबा ग्रुप यांनी पूर्वी दिलेल्या मदतीप्रमाणे, नागभीड तालुक्यातील विविध संस्था आणि संघटनाही पुढे येत आहेत. हे दानवीर पाऊल संपूर्ण विदर्भासाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक एकतेचा आणि मानवतेचा सुंदर संदेश देत आहे.
नागभीड तालुक्यातून उचललेले हे पाऊल समाजातील एकजुटीचा आदर्श ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *