चंद्रपूर जिल्ह्यातील तेलगांना सिमेलगत उप पोलीस स्टेशन लाठी हद्दीतील मौजा पोळसा या गावात शिवाजी समाधान बोडे यांच्या “राजिव समाधान मल्टीपरपज सोसायटी, हिरापूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर” नावाने मनोरंजन क्लबचा परवाना होता.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, सदर क्लबच्या ठिकाणी अवैधरित्या जुगार चालत असल्याचे समोर आले. यावरून दिनांक ०९/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून पंचनामा कारवाई केली. त्यानंतर उप पोलीस स्टेशन लाठी येथे गुन्हा क्रमांक २१/२०२५ नोंदविला गेला. संबंधित गुन्ह्यात भारतीय दंड संहिता २२३, २३८, २८९, २९२, ४९, ३(५) आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम २०२३ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सदर क्लबचे संचालक परवान्यातील अटी, शर्ती व नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार सदर मनोरंजन क्लबचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
चंद्रपूर : पोलीस छाप्यात पोळसा गावातील मल्टीपरपज क्लबचा परवाना रद्द
