• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

घुग्घुस पोलिसांची जलद कारवाई — जबरी चोरीतील आरोपी अवघ्या दोन तासांत गजाआड, मोबाईल हस्तगत

ByRoshan Khankure

Oct 7, 2025
Spread the love

या घटनेवरून पोलीस ठाणे घुग्घुस येथे अप. क्र. १९८/२०२५ कलम ७४, ७५, ३०९(४) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी तातडीने तपास पथक स्थापन केले. कोणताही ठोस पुरावा नसतानाही पथकाने कुशल तपास करत अवघ्या दोन तासांच्या आत आरोपीला शोधून अटक केली.

तपासादरम्यान आरोपी चंदन कुमार सहानी, वय २१ वर्ष, रा. मुजफ्फरनगर, बिहार (सद्य मुक्कामी — खान कॉम्प्लेक्स, घुग्घुस) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून फिर्यादीचा मोटो जी-८५ मोबाईल (किंमत ₹१२,०००/-) जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, सपोनी सचिन तायवाडे, सपोनी प्रफुल डाहुले, परि. पोउपनि गणेश अनभुले, पो.हवा/२२१५ संजय आतकुलावार, पो.हवा/२५०८ अनील बैठा, पो.अं/६४३ नितीन मराठे, पो.अं/२८२३ प्रसंनजित डोर्लीकर, पो.अं/११५० रवि वागीटकर, पो.अं/११५५ महेश भोयर, पो.अं/३३० विजय ढपकास व पो.अं/१८६७ पवन डाखरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

घुग्घुस पोलिसांच्या या तत्पर आणि कौशल्यपूर्ण कामगिरीचे स्थानिक नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *