चंद्रपूर : आज दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीतील तुकूम परिसरात पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तिघा आरोपींना सापळा रचून अटक केली आहे.
अटक आरोपींची नावे — मुदसिर नासिर शेख हुकूम (वय २१ वर्ष, रा. तुकूम, चंद्रपूर), शेख मुस्तफा शेख रहीम (वय २४ वर्ष, रा. अकोला, जि. अकोला) आणि अब्दुल राजे अब्दुल रशीद (वय ३९ वर्ष, रा. अकोला, जि. अकोला) अशी आहेत.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ६० ग्रॅम अंमली पदार्थ (Mephedrone Drug) किंमत ₹४,२०,०००/-, XUV 300 काड्या रंगाची कार किंमत ₹७,००,०००/-, ०४ मोबाईल किंमत ₹२६,०००/- आणि नगदी रक्कम ₹१६,१६०/- असा एकूण ₹११,६२,१६०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. सुदर्शन मुम्मका, अपर पोलिस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन दुर्गापूरचे ठाणेदार पो.नि. संदीप एकाडे पाटील यांच्या नेतृत्वात पो.उपनिरीक्षक प्रविण बिंकलवार, पो.हवा योगेश शार्दुल, मंगेश शेंडे, रुपेश सावे, किशोर वलके, सोनल खोब्रागडे आणि मोरेश्वर गोरे यांच्या पथकाने केली.
सदर कारवाईमुळे दुर्गापूर पोलिसांनी पुन्हा एकदा ड्रग्ज माफियांना स्पष्ट इशारा दिला आहे की, अंमली पदार्थ विक्रेत्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही.

