• Mon. Jun 1st, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

विद्यार्थ्यांनी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे ठाणेदार श्री.कांचन पांडे यांच्याशी साधला संवाद.

ByRoshan Khankure

Oct 1, 2025
Spread the love

या वेळी पांडे सरांनी विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियमांचे पालन, सायबर सुरक्षितता, शिस्तबद्ध जीवन, जबाबदार नागरिक होण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच व्यसनापासून दूर राहणे, वाईट संगती टाळणे आणि सामाजिक नियमांचा आदर करणे या संदर्भातही त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना दिल्या.

संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले असता पांडे सरांनी सोप्या उदाहरणांतून समाधानकारक उत्तरे दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास वाढला असून समाजात त्यांच्या भूमिकेबाबत जागरूकता निर्माण झाली.
यावेळी तळोधी (बा) पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गुहे ,राणी धोडवे, नारायण येग्गेवार व सिंदेवाही पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *