• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा इसम तलवारीसह अटक : घुग्घुस पोलिसांची धडक कारवाई

ByRoshan Khankure

Oct 1, 2025
Spread the love

दिनांक ३०/०९/२०२५ रोजी घुग्घुस पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, म्हातारदेवी बायपास रोड, घुग्घुस येथे एक व्यक्ती धारदार शस्त्र बाळगून नागरिकांना धमकावत आहे. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकून इसमाला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहसीन अहमद उर्फ कलवा मोहम्मद इसलाम (वय ३० वर्षे, रा. गांधी नगर, घुग्घुस) असे असून, त्याच्याकडून हातातील धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. या तलवारीची किंमत सुमारे २ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अपराध क्र. १४२/२०२५, कलम ४ व २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास घुग्घुस पोलिसांकडून सुरू आहे.

विशेष म्हणजे, हा आरोपी तडीपार असून, तडीपार कालावधीतच घुग्घुस हद्दीत येऊन अवैधरित्या शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असताना पोलिसांच्या कारवाईत सापडला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार पोनि श्री. प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वाखाली सपोनि श्री. सचिन तायवाडे, पोउपनि श्री. गणेश अनभुले, पोहवा अनिल बैठा, पोअं सुहास विधाते, पोअं महेश भोयर व पोअं विजय ढपकस यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *