गोंडपिपरी :
दिनांक २९/०९/२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी मुल श्री. सत्यजित आमले यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH33-T-3376) मधून बल्लारपूर येथील आष्टीकडे देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक होत आहे.
यावरून गोंडपिपरी पोलिसांनी तातडीने शिवाजी चौक येथे नाकाबंदी केली. त्यावेळी संशयित बोलेरो वाहन दिसून आल्यानंतर त्याची पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. पाहणीदरम्यान वाहनातून देशी दारू संत्रा ९० एम.एल.च्या ४०० बाटल्या (किंमत १६,०००/- रुपये) आणि रॉयल स्टॅग १८० एम.एल.च्या ४८ बाटल्या (किंमत १२,०००/- रुपये) असा अवैधरित्या दारू माल आढळून आला. तसेच वाहतुकीसाठी वापरलेले बोलेरो वाहन (किंमत ४,००,०००/- रुपये) असा एकूण ४,२८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (अ), ८३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल श्री. सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात सपोनि रमेश हत्तीगोटे, पोअं. अतुल तोडासे, पोअं. प्रविण कडुकर, गृहरक्षक गुडपल्ले, चिलनकर, बामणे (पोस्टे गोंडपिपरी) यांच्या पथकाने ही कारवाई केली.
