• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

रामनगर पोलिसांची कारवाई; धारदार तलवारसह आरोपी अटकेत, एक फरार

ByRoshan Khankure

Sep 24, 2025
Spread the love

चंद्रपूर :रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध हत्यार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. आरोपी धीरज बबलू यादव (वय 32, रा. लखमापूर, ता. व जि. चंद्रपूर) यास पोलिसांनी धारदार स्टीलच्या तलवारीसह ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी राहुल (मो. 7499187204, रा. लखमापूर, ता. व जि. चंद्रपूर) अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात अपक्र. 779/2025 भादंवि कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त मालामध्ये तीन स्टीलच्या धारदार तलवारींचा समावेश असून त्याची एकूण किंमत 3 हजार रुपये इतकी आहे.

घटनेची माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यावर कारवाईसाठी शहरात गस्त घालत असताना, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वडगाव ते आंबेडकर सभागृह परिसरात तलवार घेऊन दहशत निर्माण करणारा धीरज यादव यास ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष तलवार जप्त करून त्याला अटक करण्यात आली.

या कारवाईत एपीआय बलराम झाडोकर, पीएसआय संतोष निभोरकर, पीएसआय सर्वेश बेलसरे, पोहवा जयसिंह, सचिन गुरनुळे, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे व दिनेश अराडे या स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *