• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

गोविंदपुर येथे विद्यूत शॉक लागून इसमाच्या मृत्यू सौलर पंप सुरू करताना लागला शॉक

ByRoshan Khankure

Sep 25, 2025
Spread the love

गोविंदपुर येथे विद्यूत शॉक लागून इसमाच्या मृत्यू
 सौलर पंप सुरू करताना लागला शॉक
तळोधी बा;-
टाकीत पाणी भरण्याकरीता सौलर पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी सकाळी घडली. ही घटना नागभिड तालुक्यातील गोविंदपूर येथे घडली. धर्मा शेंडे असे मृतकाचे आहे. त्याच्याच घराचा सर्विस वायर वादळामुळे कटल्याने सौलर पॅनला लागून त्याला विद्युत शॉक लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपासून चंद्रपुर जिल्ह्यात अधून मधून पाऊस कोसळत आहे. काल बुधवारी सायंकाळी ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. त्याच आपत्तीने आज एकाचा बळी गेला आहे. नागभिड तालुक्यातील गोविंदपूर येथील धर्मा शेंडे याचे घराजवळील सार्वजनिक विहीरीवर सौलर पंप बसविण्यात आला आहे. त्या द्वारे टाकी भरून नागरिकांना पाण्याची सुविधा सार्वजनिकस्तरावर उपलब्ध झाली आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास धर्मा देवाजी शेंडे हा व्यक्ती सौलरवरील टाकी मध्ये पाणी भरण्याकरीता गेला. त्याने सौलर पॅन सुरू करण्याकरीता बटन लोखंडी खांबाला हात धरताच त्याला जबर विद्युत धक्का बसला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी पासून गोविंदपूर येथे पाऊस सुरू झाला असतानाच ही घटना घडली. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मा शेंडे यांच्या घरालाच लागून सार्वजनिक विहीर आहे. त्याच विहीरीवर सौलर पॅनल बसविण्यात आला आहे. विद्युत खांबावरून सौलर पॅनलच्या वरून शेंडे यांच्या घरी सर्विस वायरद्वारे विद्युत पुरवठा देण्यात आला आहे.. काल सायंकाळी पावसासह जोरदार बराचवेळ वादळी वारा आला. त्यामुळे सर्विस वायर सौलर पॅनला वांरवार आदळून कटला. सर्विस वायरमधील विद्युत प्रवाह सौलर पॅनलवरील लोखंडी भागात प्रवाहीत झाला होता. पाऊस सुरू असतानाच आज सकाळी शेंडे जेव्हा पंप सुरू करण्यासाठी गेले असता सौलर पॅनलवरील पंप बटन व लोखंडी खांबाला हात धरताच त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सौल्र पंप सदर व्यक्ती नेहमी सुरू करीत होता अशी माहिती समोर येत आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने एकाचा बळी घेतला आहे. सदर घटनेने गावात शोककळा पसरली आहे. प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. घटनेरनंतर नागभिड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविला. त्याच्या आपतकालीन मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *