• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

पाथरी गावात थरकाप उडवणारी घटना! मतिमंद अल्पवयीन मुलीवर शाळेच्या शौचालयात सामूहिक अत्याचार; दोन युवक पोलिस कोठडीत, दोन बालक सुधारगृहात

ByRoshan Khankure

Sep 23, 2025
Oplus_0
Spread the love

सलग बातमी

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी गावात मतिमंद अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १८ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपींनी पीडित मुलीला फुस लावून गावाबाहेरील शाळेच्या परिसरात नेले आणि तेथील शौचालयात जबरदस्ती नेऊन तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केला. अत्याचारानंतर मुलीला पुन्हा गावात आणून सोडण्यात आले. पीडिता मानसिकदृष्ट्या मतिमंद असल्यामुळे तिने लगेच काही सांगितले नाही, मात्र तिच्या वागण्यात झालेल्या बदलामुळे आईला संशय आला आणि २१ सप्टेंबर रोजी चौकशीत मुलीने आईला संपूर्ण प्रकार सांगितला. आईने तात्काळ पाथरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून त्यापैकी तुलाराम तानाजी मडावी (२२) आणि विक्की विनोद कोवे (२१) या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे, तर दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी पाथरी पोलिसांनी कलम 64(1), 64(2)(आय), 64(2)(के), 64(2)(एम), 70(1), 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पाथरी ठाणेदार नितेश डोर्लीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने पाथरी गावासह परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *