चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध तक्रारींचे वेळेत व पारदर्शक पद्धतीने निराकरण व्हावे, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाने विशेष उपक्रम राबविला आहे. त्यानुसार मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये ‘तक्रार निवारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आपली तक्रार मांडण्याची संधी मिळणार असून तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
कुठे कोण अधिकारी हजर असतील :
रामनगर पोलिस स्टेशन – श्री ईश्वर काटकडे, अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर
ताडोबा पोलिस स्टेशन – श्री दिनकर ठोसर, उपविभागीय पोलिस अधिकारी, चिमूर
बल्लारपूर पोलिस स्टेशन – श्री सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलिस अधिकारी, राजुरा
ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन – श्री राकेश जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी, ब्रम्हपुरी
मुल पोलिस स्टेशन – श्री सतारजीत आवले, उपविभागीय पोलिस अधिकारी, मुल
गडचांदूर पोलिस स्टेशन – श्री रवींद्र जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी, गडचांदूर
इतर सर्व पोलिस ठाणे – संबंधित पो.स्टे. प्रभारी अधिकारी
नागरिकांना आवाहन :
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन तक्रारी मांडाव्यात व या उपक्रमाचा लाभ घ्यावा. नागरिकांनी आपल्या समस्या प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडल्याने त्वरित तोडगा निघणार असून लोकाभिमुख पोलिसिंगची दिशा मजबूत होणार आहे, असे पोलिस प्रशासनाने आवाहन केले आहे.
👉 ई-मेल : sp.chandrapur@mahapolice.gov.in
👉 वेबसाईट : www.chandrapurpolice.gov.in
👉 सोशल मीडिया : @spchandrapur
