• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

गडचांदूर परिसरात दुचाकी चोरी प्रकरणाचा उलगडा; वाहनासह चोरटा अटकेत

ByRoshan Khankure

Sep 22, 2025
Spread the love

दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी गडचांदूर परिसरातून हिरो होंडा HF Deluxe (MH34-AU-5234) ही दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली होती. फिर्यादीवरून तपास सुरू करताच स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर पथकाने माहितीच्या आधारे कारवाई करून आरोपीस पकडले. आरोपीकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून तिची किंमत अंदाजे १२ हजार रुपये इतकी आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दक्षता आणि वेगवान कार्यपद्धती दाखवत अल्पावधीतच आरोपीला अटक करून प्रकरणाचा उलगडा केला. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *