• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

बल्लारपूरच्या रस्त्यांवर दहशत माजवणारा ‘गुंड निना’ अखेर MPDAच्या जाळ्यात!

ByRoshan Khankure

Sep 22, 2025
Oplus_131072
Spread the love

आकाश ऊर्फ निना राऊत हा गेल्या काही वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असून, त्याच्या कृत्यांमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण होते. धमक्या देणे, मारहाण, बेकायदेशीर वर्तन अशा अनेक प्रकारांतून तो लोकांना त्रास देत होता.

त्याच्याविरुद्ध नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांत आहे. वारंवार अटक होऊनही तो पुन्हा गुन्हेगारी मार्गाकडे वळत होता. त्याच्या दहशतीला आळा बसावा आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पोलिसांनी MPDA अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक म.स. शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश माने यांच्या देखरेखीखाली व पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या पुढाकाराने करण्यात आली.

पोलिसांच्या या निर्णायक पावलामुळे बल्लारपूर शहर व परिसरात सुटकेचा नि:श्वास सोडला जात असून, नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. पोलिसांनीही इशारा दिला आहे की, गुंडगिरी करणाऱ्यांना सोडले जाणार नाही आणि कायद्याचा कठोर बडगा कायम राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *