• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा तसेच महसूल मंडळात महसूल अदालतीचे आयोजन

ByRoshan Khankure

Sep 15, 2025
Spread the love

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 29 ऑगस्ट 2025 अन्वये
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर व माननीय उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शनात तहसील कार्यालय नागभीड येथे तीन टप्प्यात सदर सेवा पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार असून सर्व जनतेला मोहिमेचा लाभ व्हावा या दृष्टीने दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा तसेच तालुक्यातील (१)तळोधी बाळापुर (२) मिंडाळा (३) गिरगाव (४) नागभीड (५) मेंढा या महसूल मंडळात महसूल अदालतीचे आयोजन करण्यात आलेले असून या महसूल अदालतीत तालुक्यातील नागरिकांचे महसूल विषयक सर्व बाबींचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे.
तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सदर सेवा पंधरवडा चा लाभ घ्यावा असे आव्हान श्री प्रताप वाघमारे तहसीलदार नागभीड यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *