• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

देलनवाडीतील महिलेचा सर्पदंशामुळे मृत्यू – नागमोत्यावर कारवाईची मागणी

ByRoshan Khankure

Sep 14, 2025
Spread the love

चौकशीदरम्यान समजले की, सर्पदंशानंतर गावातील नागमोती नावाच्या मांत्रिकाने उपचार करण्याचा बहाणा करत त्या महिलेला स्वतःच्या घरी दीड तास थांबवून ठेवले. या काळात तिला डॉक्टर किंवा रुग्णालयात नेण्याऐवजी मंत्रोपचार सुरू ठेवले गेले. परिणामी, उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.

ही घटना अंधश्रद्धेमुळे लोकांचे जीव धोक्यात येण्याचा गंभीर इशारा आहे. यावर कारवाई करण्यासाठी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे याच्या कडे निवेदन सादर केले. नागमोत्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटनांमुळे इतरांचेही जीव जाऊ नयेत आणि कुटुंबे उद्ध्वस्त होऊ नयेत, यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गावकऱ्यांनीही प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली असून अंधश्रद्धेविरोधात जनजागृती होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *