सिंदेवाही (ता. चंद्रपूर) – दि. 06/09/2025 रोजी सिंदेवाही शहरातील विध्याविहार कॉलनीत अज्ञात चोरांनी विशाल धनराज लायनकर यांच्या घरात चोरी केली. घर रिकामे असताना चोरांनी कपाट फोडून सोन्याचे मणी व पदक, चांदीचे दोन जोडवे, चाळ आणि नगदी असा मिळून सुमारे 46,500 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रात्री घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
विशाल लायनकर आणि त्यांची आई गावी गेल्याने घर बंद होते. त्याचा फायदा घेत चोरांनी चोरी केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. पोलीस ठाणे सिंदेवाहीत तोंडी फिर्याद नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. चोरीतील मुद्देमाल शोधण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी चौकशी करत आहे.
पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. आय. भूषण युवराज पाटील आणि त्यांच्या टीमने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात असून, पोलीस प्रशासनाने सर्वांना घरातील मौल्यवान वस्तू सांभाळण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
चोरी करणाऱ्यांचा लवकर शोध लावून त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सिंदेवाहीत घरफोडी; पोलिसांचा तपास सुरू
Oplus_131072 