• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

चिखलगाव : वारंवार कारवाई होऊनही बिनधास्त धंदा – दारू तस्कर पुन्हा जाळ्यात

ByRoshan Khankure

Sep 5, 2025
Spread the love

चिखलगाव : वारंवार कारवाई होऊनही बिनधास्त धंदा – दारू तस्कर पुन्हा जाळ्यात
चिखलगाव (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) :
चिखलगाव बसस्टॅण्ड चौकात अवैध दारू तस्करीचा प्रकार पुन्हा उघडकीस आला. ग्रामस्थांनी धाडस दाखवत तस्कर जनार्दन मेश्रामला दारूसकट पकडून तळोदी पोलिसांच्या हवाली केले. या कारवाईत तब्बल ₹37,950 किमतीचा मुद्देमाल जप्त झाला.
मेश्राम हा चहा टपरीच्या आडोशाखाली दारू विक्री करीत होता. यापूर्वीही त्याच्यावर अनेकदा कारवाया झाल्या असूनही तो कायद्याला न जुमानता धंदा सुरू ठेवतो. त्यामुळे ग्रामस्थांत संताप आहे.
तळोधी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राहुल घुये यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मानकर, पीएसआय लांबट, एएसआय मेहरकुरे व पथकाने कारवाई केली.
दरम्यान, वारंवार कारवाई होऊनही हा धंदा सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “पुन्हा हा धंदा सुरू झाला, तर आम्ही अजून किती वेळा पकडणार?” असा थेट सवाल गावकऱ्यांनी केला आहे
संपादक रोशन खानकुरे चंद्रपूर 8888203020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *