• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

बुद्धीविधाता गणेश मंडळाचा उपक्रम – मोफत आरोग्य शिबिरातून समाजसेवेची नवी वाटचाल

ByRoshan Khankure

Sep 5, 2025
Spread the love

बुद्धीविधाता गणेश मंडळाचा उपक्रम – मोफत आरोग्य शिबिरातून समाजसेवेची नवी वाटचाल

सिंदेवाही (ता. चंद्रपूर) :
गणेशोत्सवात भक्तिभावासोबतच समाजोपयोगी उपक्रमांची सांगड घालण्याची परंपरा जपणाऱ्या बुद्धीविधाता गणेश मंडळ, लोणवाही-सिंदेवाही यांच्याकडून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, रक्तक्षय, डोळे तपासणी तसेच सर्वसाधारण तपासणी करून रुग्णांना योग्य औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे सर्व सेवा मोफत पुरवण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा फायदा शेकडो नागरिकांना झाला.

या उपक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. नामदेवराव किरसान साहेब यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मा. रमाकांत लोधे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विरुभाऊ जयस्वाल (माजी पंचायत समिती सभापती), सीमाताई सहारे (अध्यक्ष, महाराष्ट्र तांत्रिक कॉंग्रेस समिती, सिंदेवाही), स्वप्नीलजी कावळे (माजी नगराध्यक्ष, नगर पंचायत सिंदेवाही-लोणवाही), सचिन नाडमवार (माजी सरपंच, गडमोशी), संजय पुपरेड्डीवार (संचालक, कृषी उत्पादन बाजार समिती, सिंदेवाही), पंकज नन्नेवार (माजी पाणीपुरवठा सभापती, नगर पंचायत सिंदेवाही-लोणवाही), पुजाताई रामटेके (उपाध्यक्ष, नगर पंचायत सिंदेवाही-लोणवाही), नीताताई रणदिवे (नगसेविका), मीनाक्षीताई बंसोड (विस्तार अधिकारी), मंगेश मेश्राम (ग्रामपंचायत सदस्य, रत्नापूर), तसेच विनोदजी सहारे, संदीप भरडकर, महेश मंडलवार (तालुका अध्यक्ष), घडसे सर, बनकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

🎤 कार्यक्रमाचे संचालन सुनीलजी उईके सर (अध्यक्ष, प्रा.शिक्षक सोसायटी, सिंदेवाही) यांनी ओघवत्या शैलीत केले, तर मनमोहक प्रस्तावना पुणेश्वर डोंगरवार सर यांनी सादर केली. शेवटी रंजीत निकुरे यांनी आभार प्रदर्शन करून सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी बुद्धीविधाता गणेश मंडळाचे अध्यक्ष शंकर कोलते, उपाध्यक्ष पूजाताई रामटेके यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आरोग्य शिबिरामुळे गावात “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजसेवेचे व्यासपीठ आहे” असा संदेश पोहोचला. नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव उमटले होते. 🌺

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *