• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

“श्री गणेशा आरोग्याचा” – तळोधी बाळापुरमध्ये मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

ByRoshan Khankure

Sep 4, 2025
Spread the love

“श्री गणेशा आरोग्याचा” – तळोधी बाळापुरमध्ये मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्री सामुदायिक अभियान 2025 अंतर्गत “एक गाव, एक गणपती” या संकल्पनेतून तळोधी बाळापुर येथील गोवारी वॉर्डमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून “श्री गणेशा आरोग्याचा” हे आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले.

या आरोग्य शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र, तळोधी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम पिसे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष श्री. रोशन धाडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात NCD स्क्रिनिंग, रक्त तपासणी, सिकल सेल, रॅपिड HB, आबा कार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी अशा विविध आरोग्य सेवा देण्यात आल्या. उपस्थित रुग्णांना मोफत औषधेही देण्यात आली. या शिबिराचा सुमारे 150 नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिर यशस्वी होण्यासाठी खालील आरोग्य कर्मचारी व सेवकांनी मोलाची साथ दिली:
आरोग्य सेवक – गोपाल मैंद, राजेंद्र दिघोरे, अमोल गेडाम, गजानन वैद्य, राकेश समर्थ
फ्लेबोटोमिस्ट – माधुरी शिवनकर
डी.ई.ओ. – अमोल वंजारी
आशा वर्कर्स – मंगला अगडे, स्वाती मदनकर, वैशाली खंडारे, रंजना बोकडे, रोशनी सहारे, कुंदा मरसकोल्हे

या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली असून, आगामी काळात अशाच उपक्रमांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *