सिंदेवाही: गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त शांतता समितीची बैठक यशस्वी
सिंदेवाही (दि. 01/09/2025) – श्री गणेशोत्सव 2025 व ईद-ए-मिलाद सणानिमित्त शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे विशेष शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक तुलसी मंगल कार्यालय, सिंदेवाही येथे सकाळी 11:30 ते 13:30 वाजता पार पडली.
बैठकीचे अध्यक्ष माननीय राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी होते. यावेळी उपस्थित होते माननीय तहसीलदार संदीप परमानंद, सिंदेवाही शहर नगराध्यक्ष भास्कर ननावरे, कनिष्ठ अभियंता रामटेके, सिंदेवाही नगर पंचायतचे अधिकारी, पोलीस स्टेशन सिंदेवाहीचे ठाणेदार कांचन. प. पांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व इतर शासकीय अधिकारी.
शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, ईद-ए-मिलाद कमिटीचे सदस्य, पोलीस पाटील, प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि डीजे मालक यांसह अंदाजे 450 ते 500 नागरिक उपस्थित होते.
बैठकीत शहरातील उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, वाहतूक नियमन आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पोलीस निरीक्षक कांचन. प. पांडे यांनी सर्व उपस्थितांना माहिती दिली व नागरिकांचे सहकार्य आवाहन केले.
