• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

गडबोरी वासेरा उमा नदी पुलाखाली अडकलेल्या मृतदेहाची हातावर ‘अर्जुन’ नावावरून ओळख पटली

ByRoshan Khankure

Aug 29, 2025
Oplus_131072
Spread the love

गडबोरी वासेरा उमा नदी पुलाखाली अडकलेल्या मृतदेहाची हातावर ‘अर्जुन’ नावावरून ओळख पटली

सिंदेवाही (दि. २८ ऑगस्ट २०२५)
गडबोरी वासेरा येथील उमा नदी पुलाखाली आज सकाळी आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे.
आज सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना पुलाखाली नदीच्या काठाला लटकलेला मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ सिंदेवाही पोलिस स्टेशनला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिंदेवाही येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. काही वेळातच हा प्रकार वाऱ्यासारखा गावभर पसरला व मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमा झाले.
मृतदेहाचा चेहरा सडल्यामुळे ओळख पटणे कठीण झाले होते, मात्र हातावर गोंदवलेले “अर्जुन” नाव पाहून मृताची ओळख निश्चित करण्यात आली. दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांना ही माहिती मिळाल्यानंतर ते पोलिस स्टेशनला पोहोचले व सदर मृतदेह हा अर्जुन सोमा पाटील (रा. रामपूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) हाच असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्जुन पाटील हे २० ऑगस्ट २०२५ रोजी घरून बाजारात गेले होते, मात्र ते बाजारातून परतलाच नाहीत. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी लापता तक्रार नोंदवली होती. त्यांच्या हरवल्याबाबतचा शोधपत्रकही परिसरात वितरीत करण्यात आला होता.
घटनेनंतर सिंदेवाही पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बावणे साहेब, ए.एस.आय. सोनवणे साहेब आणि त्यांची टीम करीत आहे.

मुख्य संपादक:रोशन खानकुरे
रोशन खानकुरे चंद्रपूर को. 8888203020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *