गुंजेवाही येथे तान्हा पोळा निमित्य उसडला जनसमुदाय..
सार्वजनिक तान्हा निमित्य बाहेर गावातील आलेल्या जनतेचा चांगला प्रतिसाद.
गुंजेवाही येथे दरवर्षी प्रमाणे पारंपारिक तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, सदर पोळ्याध्ये गावातील जनता तसेच बाहेर गावातील लोक आवर्जून उपस्थित राहतात, यावर्षी सुद्धा बाळगोपाळांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणे पाहायला मिळाली.तान्हा पोळा कमेटी तर्फे तसेच मान्यवरांच्या उपस्थित देण्यात सर्व बालगोपालांना खाऊ देण्यात आले.तसेच सर्व नंदी बैलांना *बकेट* देण्यात देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य म्हणून मा. वीरू भाऊ जयस्वाल, . चंद्रशेखर चन्ने, .राहुल पोरेडडीवार . मनोज चन्ने, सरपंच -वसंत टेकाम, पुनेश गांडलेवार, शंकर भाई निषाद,कार्तिक जयस्वाल,अमोल चन्ने अरुण मादेश्वर, . सादिक शेख, भगवान दुर्गे,धनराज सोनकर, सुरेश कोरेवार,विलास वाढगुरे, सुभाष शेंडे, रोशन कोरेवार, आशिष भानारकर, चंद्रकांत मोहुर्ले, तोरे साहेब, अश्विन मडावी, पंकज सोनकर, सोनकर, किशोर सोनकर, बाळू रामटेके,रवी चन्ने, राजू गद्देवार,किशोर मेश्राम,पोलीस पाटील,सोमा तोडासे, गोलू सुरपाम, तसेच कार्यक्रमाला ग्रा.पं. कमेटी चे कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे सहकार्य लाभले.गावकऱ्यांच्या उपस्थित सर्व बालगोपालाच्या आगमनानंतर तान्हा पोळा समितीच्या वतीने सर्व जनतेचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आले.गावातील पोळा समीतीच्या वतीने हनुमान मंदिर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विधिवत नंदी बैलांची पूजन करून सर्व नंदी ना बकेट वितरित करण्यात आले.या तान्हा पोळ्यात 790 नंदी बैलाने सहभाग घेतलं..आमच्या गावातील तसेच सर्व बाहेरील गावातील युवकांनी d.j.च्या तालात सुरात नाचण्यात आनंद लुटला. यावेळी विशेष आकर्षक म्हणून *महाकाल झाकी* चं उत्कृष्ठ आयोजन तान्हा पोळा समितीकडून करण्यात आले.यावेळी गावातील तसेच बाहेर गावातील जनतेचा मोठ्या संख्येने बाळगोपाळ आपल्या नंदीबैलांसह उपस्थित होते.
