• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

लोणवाहीतील बुद्धी विधाता गणेश मंडळाच्या उत्सवात कायराच्या ‘कांतारा’ लूकला दाद

ByRoshan Khankure

Aug 25, 2025
Spread the love

लोणवाहीतील बुद्धी विधाता गणेश मंडळाच्या उत्सवात कायराच्या ‘कांतारा’ लूकला दाद

लोणवाही (ता. सिंदेवाही) : लोणवाही येथील बुद्धी विधाता गणेश मंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. नगरसेवक पंकज नन्नेवार यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या सोहळ्यात बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

नंदी सजावट, सुदृढ बालक आणि वेशभूषा स्पर्धा यामध्ये गावातील लहानग्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजजागृतीचे संदेश देणाऱ्या कल्पक वेशभूषांमुळे स्पर्धा रंगतदार ठरली.

त्यात विशेष दाद मिळाली ती कायरा सुनील गेडाम हिने साकारलेल्या ‘कांतारा’ चित्रपटातील वेशभूषेला. तिच्या आकर्षक वेशभूषेमुळे नागरिकांसह निरीक्षण समितीनेही मोठे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान कायरासोबत फोटो काढण्यासाठी अनेकांचा उत्साह उसळला.

स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कायराला वेशभूषा स्पर्धेचा प्रथम क्रमांक देण्यात आला. हा पुरस्कार वन परिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही अंजली बोरावार (सायंकार) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सीमा सहारे, नंदा नरसाळे, लता गेडाम, दिलीप दुस्सावार, सुनील उईके, मधुकर जल्लावार, गणेश गोलपल्लीवार, मोहुर्ले सर, श्यामकुवार सर, रवी सावकुडे, सुनील जनबंधू, गोपी लोंढे, चिंटू कटारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कायराच्या या यशामागे तिच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. मृणाली, अनुष्का आणि अंशुल महेंद्र गेडाम यांनी अथक मेहनत घेऊन ही वेशभूषा साकारली. त्यांच्या परिश्रमाला आणि कायराच्या प्रतिभेला गावकऱ्यांकडून भरभरून दाद मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *