• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

सिंदेवाही-लोणवाडी तान्हा पोळा उत्सव : परंपरेसोबत समाजजागृती

ByRoshan Khankure

Aug 25, 2025
Spread the love

सिंदेवाही-लोणवाडी तान्हा पोळा उत्सव : परंपरेसोबत समाजजागृती

सिंदेवाही-लोणवाडी नगरपंचायत तर्फे यंदाचा तान्हा पोळा उत्सव इको-फ्रेंडली पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लाकडी पोळ्यांची पूजा, आकर्षक सजावट आणि मुलांची वेशभूषा यामुळे उत्सवाला विशेष रंगत आली.

बालकांनी कागद-पाने व नैसर्गिक साहित्य वापरून इको-फ्रेंडली सजावट केली. यातून पाणी संवर्धन, दारूबंदी, शेतकरी आत्महत्या थांबवा, शेतकऱ्यांचे प्रश्न, विज्ञान, शिक्षण, सैनिकांचे बलिदान, पीकनुकसान अशा महत्त्वपूर्ण विषयांवर जनजागृती करण्यात आली.

🎭 विशेष आकर्षण म्हणून छावाच्या वेशभूषेने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. या वेशभूषेवर लोकांनी मोठ्या उत्साहात सेल्फी घेतले आणि उत्सव अधिकच आकर्षक व संस्मरणीय बनला.

नगरपंचायतच्या या उपक्रमामुळे उत्सवाला शैक्षणिक व समाजाभिमुख स्वरूप प्राप्त झाले. यंदा मुलांसाठी विविध स्पर्धा व बक्षिसे आयोजित केल्याने तळोदी, सावरगाव, राजुली यांसारख्या आसपासच्या गावांतील बालगोपाळही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे आणि नगरपंचायतच्या पुढाकारामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शैक्षणिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला
मुख्य संपादक: रोशन खानकुरे, सिंदेवाही
📞 मो. 88882 03020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *