समानतेचा आणि सर्वसमावेशक विचारांचा स्वभाव असलेल्या सौ. किरणताई कापगते या नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार म्हणून नावारूपाला येत आहेत. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधण्याची त्यांची कार्यशैली नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, शिक्षण क्षेत्रात आणि स्वच्छतेसाठी त्यांनी घेतलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
किरणताई यांनी नेहमी पक्षनिरपेक्ष भावनेतून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांच्या समतोल आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे नगरपरिषदेच्या कार्यात नवा आदर्श निर्माण होऊ शकतो, असा जनतेचा विश्वास आहे. शहरातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक वर्गात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि आपुलकी निर्माण झाली आहे.
त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे शहरातील नागरिक एकमुखाने म्हणत आहेत की, “समानतेचा विचार करणाऱ्या सौ. किरणताई कापगते यांच्याच हाती नगराध्यक्षपदाची सूत्रे यावी!”
जनतेच्या अपेक्षेनुसार त्यांना ही संधी मिळावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
समानतेचा स्वभाव असलेल्या सौ. किरणताई कापगते यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळावी अशी जनतेची अपेक्षा
