चंद्रपूर जिल्हा | गोंडपिंपरीपोलीस ठाणे गोंडपिंपरी हद्दीतील मौजा करंजी येथे पोलिसांनी गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत एकूण १२ गोवंशीय जनावरे आणि एक पिकअप वाहन जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ₹५.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गोपनीय माहितीच्या आधारे करंजी परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, एक पिकअप (क्र. MH 34 BZ 6550) संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिल्यावर चालकाने वाहन न थांबवता पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत वाहन दुबागुडा मार्गावर सोडलेले अवस्थेत सापडले.तपासणीदरम्यान वाहनात १२ गोवंशीय जनावरे दाटीवाटीने बांधलेली आढळली. त्यापैकी ४ जनावरे मृत अवस्थेत होती. सदर वाहन व जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, एकूण ₹५,८५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक खुशाल टेकाम, पोलीस कर्मचारी प्रविण कदम, गायकवाड यांनी केली.
