भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त तळोधी बा .पोलिस दलाच्या वतीने 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7:00 वाजता ‘वॉक फॉर युनिटी’ या विशेष पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकता, सामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, सरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारांप्रमाणे अखंड भारताची भावना जनमानसात रुजवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आाहे. शौर्य, सेवा आणि एकतेचा संदेश देणा-या रॅलीची सुरुवात श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टॉप तळोधी बा. ते पोलीस स्टेशन पर्यंत मुख्य रस्त्याने ही रॅली काढण्यात आली.
या तळोधी चे थानेदार राहुल गुहे यांच्या नेतृत्वात या ‘वॉक फॉर युनिटी’ या विशेष या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या पायदळ रॅलीचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. या दोन कि.मी. अंतर काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये पोलीस विभाग, तळोदी बा. वन विभाग कर्मचारी, स्वाब एनजीओ चे संपूर्ण पदाधिकारी, स्वप्नझेप करिअर अकॅडमीचे विद्यार्थी शिक्षक, तथा जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथील विद्यार्थी व शिक्षक, तळोधी बाळापूर पत्रकार संघाचे पत्रकार मंडळी , व गावातील प्रतिष्ठित नागरिक, परिसरातील पोलीस पाटील व युवक यांनी सहभाग नोंदविला.
यानंतर तळोधी पोलीस स्टेशन परिसरामध्ये स्वाब संस्था, स्वप्नझेप अकॅडमीचे, तथा जवाहर नवोदय विद्यालय वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पी.एस. आय. चंद्रकांत लांबट यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पोलिसांच्या वतीने पोलीस दलात वापरण्यात येणाऱ्या शस्त्र यां बद्दल माहिती दिली. ‘वॉक फॉर युनिटी’ या विशेष पायदळ रॅलीमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या एनजीओ, अकॅडमी, विद्यार्थी व इतर उपस्थितांचे आभार मानण्यात आले.