• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

चंद्रपूर पोलीसांची विक्रमी अंमली पदार्थ विरोधी कारवाई — ५२८ ग्रॅम एम.डी ड्रग्ज जप्त, ₹३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ByRoshan Khankure

Oct 6, 2025
Spread the love

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारास स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, वसीम इमदाद खान (वय ३७, रा. गोंवडी, मुंबई) हा एमएच-१० ईक्यू-०४२१ क्रमांकाच्या कारने एम.डी ड्रग्ज घेऊन चंद्रपूरात विक्रीसाठी येत आहे. या माहितीवरून पोलिसांनी नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६३ वरील साखरवाही फाट्याजवळील एच.पी पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. थोड्याच वेळात संशयास्पद कार आल्यानंतर पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली असता, आरोपीकडून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेली ५२८ ग्रॅम एम.डी ड्रग्ज पावडर (प्रति ग्रॅम किंमत ₹५,०००/-) असा ₹२६,४०,०००/- किमतीचा माल, वापरता मोबाईल, रोख रक्कम आणि कार असा ₹३५,०७,४८०/- रुपयांचा एकूण मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अन्वये पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सन २०२५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कारवाईंमध्ये पोलिसांनी विक्रमी कामगिरी केली आहे. एन.डी.पी.एस. अधिनियमांतर्गत एकूण १५७ गुन्हे नोंद होऊन १९२ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, आरोपींकडून ₹८०,५९,७७४/- किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. गांजा विक्री प्रकरणात २६ गुन्हे नोंद, ५५.२४ किलो गांजा जप्त, ४० आरोपी अटकेत, ₹६,६२,१६४/- माल जप्त करण्यात आला. एम.डी ड्रग्ज प्रकरणात १४ गुन्हे नोंद, ७२२.६१४ ग्रॅम एम.डी ड्रग्ज जप्त, ३१ आरोपी अटकेत, ₹४३,७८,०६०/- माल जप्त झाला. ब्राऊन शुगर प्रकरणात १ गुन्हा नोंद, २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त, २ आरोपींवर कारवाई, ₹३०,१९,५५०/- माल जप्त झाला. तसेच अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या १८६ आरोपींवर १५६ गुन्ह्यांतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्हा नशामुक्त करण्यासाठी पोलीस विभागाने “ड्रग फ्री चंद्रपूर कॅम्पेन” अंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविले आहेत. SAY NO TO DRUGS, YES TO LIFE या घोषवाक्याखाली शाळा, महाविद्यालयांत व्याख्याने, सायकल रॅली, ध्यानशिबिरे, पोस्टर व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. १५ ऑगस्ट २०२५ रोजी पालकमंत्री मा. अशोक उइके यांच्या हस्ते नशामुक्ती अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. गणेशोत्सव व नवरात्रादरम्यानही विविध ठिकाणी फ्लेक्स, फलक व प्रचार मोहीम राबविण्यात आली. होमगार्ड, महिला समित्या, युवक मंडळे व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून जिल्हाभर जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्हा पोलीसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अंमली पदार्थ विक्री अथवा साठा संबंधी कोणतीही माहिती असल्यास तात्काळ डायल ११२ किंवा मो. नं. ७८८७८९०१०० वर संपर्क साधावा. आपली ओळख पूर्णतः गुप्त ठेवली जाईल.
या कारवाईचे मार्गदर्शन मा. सुदर्शन मुमक्का (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) व श्री. ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक) यांनी केले. ही कारवाई अमोल काचोरे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखाली एपीआय दीपक कांकेडवार, बलराम झाडोकार, विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार, तसेच पोहवा सुभाष गोहकार, इम्रान खान, सतिश अवथरे, रजनीकांत पुठठावार, दिपक डोंगरे, शंशाक बदामवार, विजयमाला वाघमारे, प्रमोद डंभारे आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

👉 चंद्रपूर पोलीस दलाची निर्णायक कारवाई — नशेच्या साखळीवर मोठा घाव, गुन्हेगारीला रोख बसणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *