६,४७,२००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
ब्रम्हपुरी, दि. ३० सप्टेंबर :
ब्रम्हपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैधरित्या दारु वाहतुक करणाऱ्या दोघांना अटक करून तब्बल ६ लाख ४७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी ब्रम्हपुरी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, नागभीड ते ब्रम्हपुरी रोडने एक चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारु वाहतुक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पॉलीटेक्नीक कॉलेज रोड, ब्रम्हपुरी येथे नाकाबंदी लावली.
नाकाबंदी दरम्यान नागभीडकडून येत असलेली स्विफ्ट डिझायर (MH40-Y-6149) ही संशयित गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. पंचासमक्ष पाहणी केली असता वाहनाच्या डिकीतून १५ खर्ड्यांचे खोके आढळले. प्रत्येक खर्ड्यात ४८ नग प्रमाणे ७२० सिलबंद बाटल्या (प्रत्येकी १८० एम.एल.) अशा दारुच्या बाटल्या आढळल्या. या बाटल्यांची किंमत १,८७,२००/- रुपये एवढी आहे.
याशिवाय वाहतुकीसाठी वापरलेली गाडी किंमत ४,६०,०००/- रुपये अशी असून, एकूण मुद्देमालाची किंमत ६,४७,२००/- रुपये इतकी आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी
१) प्रफुल्ल प्रकाश घरडे (३२, रा. हनुमान नगर, ब्रम्हपुरी)
२) अनिल रामभाऊ दांडेकर (३०, रा. हत्तीगोटा, ब्रम्हपुरी)
यांना अटक करून त्यांच्या विरोधात कलम ६५(अ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या कारवाईचे मार्गदर्शन श्री. मुम्मका सुदर्शन (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर), श्री. ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) व श्री. राकेश जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी) यांनी केले.
कारवाईत ठाणेदार पोनि प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वाखाली सपोनि मनोल खडसे, पोहवा योगश शिवणकर, अजय कटाईत, मुकेश गजबे, पोअं स्वप्नील पळसपगार, इरशाद खान, चंदु कुळसंगे (पोस्टे ब्रम्हपुरी) यांनी सहभाग घेतला.
👉 पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
