• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

सहा लाखांच्या उसनवारीतून खूनी कट – सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाची हत्या करून प्रेत नाल्यात फेकले!

ByRoshan Khankure

Sep 27, 2025
Spread the love

घटना शुक्रवारी रात्री घडली. जेवणानंतर आरोपीने गेडाम यांना “महत्वाचे काम आहे” असे सांगत टेकाडी परिसरात नेले. तेथून एमआयडीसी मार्गाने मूलकडे येत असताना वाद चिघळला. त्यानंतर लोखंडी सळाखीने वार करून हत्या करण्यात आली.

दरम्यान, गेडाम घरी परत न आल्याने त्यांच्या मुलाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान आकापूर जवळ मृतकाची पल्सर दुचाकी, मोबाईल, चष्मा व चप्पल आढळली. संशयित किस्मत अलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेत लपविल्याचे ठिकाणही पोलिसांना दाखवून दिले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. या प्रकरणी किस्मत अलीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत. आरोपीचा गुरे खरेदी–विक्रीचा व्यवसाय असल्याने या प्रकरणात इतरांचा सहभाग असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *