कोषाध्यक्ष पदाची धुरा विकास शेडमाके यांच्या खांद्यावर – आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर :
भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी आघाडी, पोभुर्णा तालुका, कोषाध्यक्ष पदावर विकास शेडमाके यांची नुकतीच निवड झाली आहे. या नियुक्तीबद्दल आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदनपर पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, “आपल्या मेहनतीमुळे, कार्यकर्त्यांमधील लोकप्रियतेमुळे आणि सातत्याने केलेल्या योगदानामुळे हे जबाबदारीचे पद आपणास प्राप्त झाले आहे. आपले कार्य, अनुभव आणि निष्ठेमुळे पक्ष संघटनेस नवे बळ मिळेल.”
तसेच येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये विकास शेडमाके यांनी सक्रिय सहभाग घेऊन भारतीय जनता पक्षाच्या पताकेला अधिक उंचीवर नेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
पत्राद्वारे आ. मुनगंटीवार यांनी पुढे असेही लिहिले की, “आपल्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेस नक्कीच नवे बळ मिळेल. लोकाभिमुख कार्यातून पक्ष अधिक मजबूत होईल.”
शेवटी त्यांनी विकास शेडमाके यांना पुन्हा एकदा अभिनंदन करून, भविष्यातील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
