प्रतिनिधी:विकास शेडमाके
दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर नागपूर ,येथे महाराष्ट्र पूर्व विदर्भाचे एमकेसीएल चे कम्प्युटर उद्योजकांचे कार्यक्रम पार पडले,त्यामध्ये विदर्भातील संपूर्ण उत्कृष्ट कॉम्पुटर उद्योजकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळेस चंद्रपूर जिल्यातील मूल तालुक्यातील नांदगाव या छोट्याशा गावातील परिसरातील नामांकित असलेली श्री नरेश नीलकंठ नरसपुरे सर यांचे श्रेयश कम्प्युटर इन्स्टिट्यूट ला करिअर लांचपॅड चॅम्पियन या पुरस्काराने MKCL मॅनेजिंग डायरेक्टर – आदरणीय समीर पांडे सर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
या वेळेस कार्यक्रमाला उपस्थिती
MKCL मॅनेजिंग डायरेक्टर – आदरणीय समीर पांडे सर
MKCL सिनियर जनरल मॅनेजर – आदरणीय अतुल पतोडी सर
MKCL सिनियर जनरल मॅनेजर – आदरणीय अमित रानडे सर
पूर्व विदर्भ समन्वयक – आदरणीय शशिकांत देशपांडे सर
चंद्रपुर जिल्हा समन्वयक – लक्ष्मीकांत कांबळे सर,
हे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आले.
