महसुल विभाग ब्रम्हपुरी यांचेकडुन अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर मा. विनय गौडा यांचे मार्गदर्शनात ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा नान्होरी येथे रात्रो अवैध वाहतुक / उत्खननावर करणा-या वाहनांवर धाड टाकण्यात आली. अवैध रेती उत्खनन /वाहतुक यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याकरीता महसुल विभागाने फिरते व स्थानिक पथक स्थापन केले. फिरत्या पथकामार्फत दिनांक २३/०९/२०२५ रात्री १२.३० वाजता मौजा नान्होरी येथे रेती या गौण खनिजाची अवैध साठवणुक करुन सदर साठयातून हायवाने वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वेश काळे, रा.नागभीड यांचे मालकीची JCB क्रमांक MH ३४ AP – १८४९, श्री राकेश भेंडारे रा. नान्होरी यांचे मालकीचे स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर चेसीस क्रमांक MBNAK४९AHRTK३६०२३ प्रविण नथमल दोनाडकर रा. दिघोरी यांचे मालकीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर चेसीस क्रमांक MBNAK४९AHRTA२३५७१, व वाहन चेसीस क्रमांक MBNAS४८ABMTL५३८९७, सचिन वाघमारे रा. नागपुर यांचे मालकीचे हायवा क्रमांक MH ३५ AJ ३१०६ ईत्यादी वाहने व यांत्रीक साधने जप्त करण्यात येवुन पोलीस स्टेशन, ब्रम्हपुरी येथे डिटेन करण्यात आले. सदर वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम १९६६ चे कलम ४८ (७) (८) नुसार कार्यवाही करण्यात येवुन वाहन मालकांवर गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरु आहे. यापुढे ब्रम्हपुरी तालुक्यात अवैध वाहतुकीवर कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार ब्रम्हपुरी यांनी सांगीतले. सदरची कार्यवाही मा.पर्वणी पाटील मॅडम, उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, तहसीलदार मा.सतिश मासाळ यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. तहसीलदार सतिश मासाळ, यांचे सोबत पथक मध्ये नरेश बोधे मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकारी हीमांशु पाजनकर, स्वप्नील ईसड हे उपस्थित होते.
