चंद्रपूर : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आज, मंगळवार दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी वाढोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वन विभाग व स्वाब संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 200 झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात आलेवाही बीटचे वनरक्षक पंडित मेकेवार, स्वाब संस्थेचे यश कायरकर, जीवन गुरनुले, अनमोल शेलोकर, गणेश गावतूरे आदी सदस्यांनी विशेष भूमिका बजावली. तसेच वाढोणा समाजसेवा विद्यालय येथील विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी डॉ. अभिजित बनपुरकर (वैद्यकीय अधिकारी, वाढोणा), सौ. अंजुषा आंबोरकर (लॅब टेक्निशियन), सौ. ज्योती उइके (आरोग्य सेविका), श्री चंद्रशेखर मोहुर्ले (आरोग्य सहाय्यक) आणि श्री धर्मेंद्र गोवर्धन (आरोग्य सेवक) यांनी सहकार्य करून या उपक्रमाला अधिक बळ दिले.
या वृक्षारोपणामुळे परिसरात हरिताई वाढण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण झाली. स्वाब संस्थेच्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
स्वाब संस्था व वन विभागाच्या पुढाकाराने वाढोणा आरोग्य केंद्रात 200 झाडांचे वृक्षारोपण
