• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

चंद्रपूर:- महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी पदवीधरांना ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (CCMP) आणि प्रमाणपत्रावर आधारित नोंदणीस परवानगी दिल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर शाखेने एक दिवसाचा संप पुकारला आहे.

ByRoshan Khankure

Sep 18, 2025
Oplus_131072
Spread the love

या संपामुळे गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल आणि दवाखाने बंद राहणार आहेत.

मुख्य आक्षेप :

1️⃣ शैक्षणिक असमानता – MBBS हा 5.5 वर्षांचा सखोल अभ्यासक्रम आहे, तर CCMP फक्त 1 वर्षाचा. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड होणार.

2️⃣ रुग्ण सुरक्षिततेवर धोका – अपूर्ण प्रशिक्षणामुळे चुकीचे निदान व उपचार होऊ शकतात.

3️⃣ दुहेरी प्रणालीचा धोका – MMC ही फक्त MBBS डॉक्टरांसाठी आहे. CCMP डॉक्टरांना परवानगी दिल्यास गोंधळ वाढेल.

4️⃣ कायदेशीर बाबी – राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमांनुसार आधुनिक औषधोपचारासाठी फक्त MBBS डॉक्टर पात्र आहेत.

5️⃣ आंतरराष्ट्रीय दर्जा कमी होण्याची भीती – CCMP मुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय व्यवस्थेचा मानक दर्जा कमी होईल.

6️⃣ भविष्यातील दुष्परिणाम – या निर्णयामुळे इतर पर्यायी पद्धतीच्या डॉक्टरांकडूनही अशा मागण्या वाढतील.

आमची मागणी :

CCMP डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी देण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करावा.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ MBBS डॉक्टरांनाच आधुनिक वैद्यकीय परवाना द्यावा.

संबंधित 05/09/2025 चे परिपत्रक त्वरित मागे घेण्यात यावे.

आंदोलनाचा निर्णय :

दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण राज्यभर 24 तासांचा लाक्षणिक संप करण्यात येणार असून सर्व आरोग्यसेवा बंद ठेवण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *