चंद्रपूर – ग्रामीण दुर्गम भागातील इंदिरा गांधी विद्यालय, पालेबारसा या शाळेने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सावली तालुक्याचे प्रतिनिधित्व करत या शाळेच्या १४ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने कोरपणा तालुका संघावर मात करून विजयी ठरले. या शानदार विजयामुळे संघ आता नागपूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दाखवलेली खेळातील जिद्द, संघभावना आणि मेहनत कौतुकास्पद ठरली. त्यांचा हा विजय फक्त खेळापुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यास प्रेरणा देणारा ठरला आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विलास लोखंडे सर, पर्यवेक्षक मुळे सर, तसेच मार्गदर्शक शिक्षक अमन लेंजे, सुधीर नागोसे आणि गुरनुले सर यांनी विजयी खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुधाताई शेंडे, सचिव डॉ. केशवराव शेंडे शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनीही विजयी संघ व मार्गदर्शकांचे कौतुक करून त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी प्रेरणा आणि शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातून आलेल्या या खेळाडूंनी शाळेचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले असून त्यांचा हा पराक्रम संपूर्ण तालुका आणि गावास अभिमान वाटावा असा आहे. आता त्यांच्या पुढील विजयाच्या वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- रोशन खानकुरे 8888203020
