सिंदेवाही : संत गजानन महाराज फार्मसी व नर्सिंग कॉलेजचा पहिला गणेशोत्सव नवीन इमारती उत्साहात संपन्न
सिंदेवाही (दि. ३१ ऑगस्ट २०२५) : सिंदेवाही-गडमौशी येथील संत गजानन महाराज फार्मसी व नर्सिंग कॉलेज मध्ये यंदा कॉलेजच्या नवीन इमारतीत पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा झाला. पाच दिवस चाललेल्या या उत्सवात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य-गीत सादर केले तसेच इको-फ्रेंडली गणेशोत्सवाबाबत जनजागृती केली. अंतिम दिवशी भजन मंडळाच्या गजरात गणेशाची आरती, गोपालकाला, त्यानंतर डीजे-डॉल्बीवर जल्लोष झाला व गणेशाचे विसर्जन थकाबाई तलावात करण्यात आले. या वेळी नागरिक, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्वांना महाप्रसाद देण्यात आला. या यशस्वी आयोजनासाठी माननीय सौ. सुधाताई शेंडे (अध्यक्ष, संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ), माननीय डॉ. केशवराव शेंडे (सचिव) आणि माननीय श्री. प्रशांत (मुनाभाऊ) शेंडे (सहसचिव) यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला मान्यवरांमध्ये माननीय श्री. टिकेश अग्रवाल (प्राचार्य, संत गजानन महाराज फार्मसी कॉलेज), माननीय कु. काजल शहा (प्राचार्या, बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज), माननीय कु. नेहा (प्राचार्या, जी.एन.एम. नर्सिंग कॉलेज), माननीय सौ. शितल मुलेमवार (प्राचार्या, ए.एन.एम. नर्सिंग कॉलेज), माननीय सौ. कांता घुगुस्कर (प्राचार्या, सीताबाई शेंडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाही), माननीय श्री. विलास लोखंडे (प्राचार्य, इंदिरा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, पालेबारसा), माननीय श्री. परशुराम समर्थ (प्राचार्य, संत गजानन महाराज हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, पेंढरी), माननीय श्री. श्रीकांत लाखे (मुख्याध्यापक, शरदचंद्र उच्च प्राथमिक स्कूल, सिंदेवाही), माननीय श्री. बारीकराव खोब्रागडे (मुख्याध्यापक, हायस्कूल चिकलगाव), माननीय श्री. जगदीश गेडाम (मुख्याध्यापक, हायस्कूल कनाळगाव), माननीय प्रा. चंद्रकांत गंडाटे (महिला महाविद्यालय, सिंदेवाही), माननीय श्री. अमोल डोंगरवार (सी.इ.ओ, संत गजानन महाराज मल्टीस्टेट बँक, सिंदेवाही) आणि माननीय श्री. प्रमोद कारमेंगे (प्रमुख, व्यसनमुक्ती केंद्र) आदींचा उपस्थिती लाभला. संपूर्ण उत्सवात विद्यार्थ्यांचा उत्साह, प्राध्यापकांचा सहभाग आणि नागरिकांचा सहकार्य उल्लेखनीय होता. पहिल्या गणेशोत्सवाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत असून हा उत्सव भक्ती, संस्कृती आणि जल्लोषाचा सुंदर संगम ठरला अशी भावना व्यक्त होत आहे. 🙏✨
