नागभीड (दि. 09 नोव्हेंबर 2025):
नागभीड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कान्पा गावात मोठी कारवाई करत एका युवकाच्या अंगणातून गांजाची झाडे जप्त केली आहेत.आरोपी रक्षद प्रभाकर आत्राम (वय 23, रा. आदिवासी मोहल्ला, वार्ड क्र. 3, कान्पा) याने आपल्या घराच्या अंगणात गांजाची 47 झाडे लावून संगोपन केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्यावर धडक कारवाई केली. या झाडांचे एकूण वजन 23 किलो 910 ग्रॅम असून, अंदाजे किंमत ₹2,39,100 एवढी आहे.या प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 381/2025 कलम 8(क), 20(ब)(ii)(क) अंतर्गत NDPS Act 1985 नुसार नोंद करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
पथकात सपोनि दिलीप पोटभरे, पोउपनि अजिंक्य गोविदलवार, तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि किशोरकुमार वैरागडे हे करीत आहेत.
नागभीड पोलिसांची कारवाई — कान्पा परिसरात गांजाची लागवड उघडकीस
