सावली (जि. चंद्रपूर) :
राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी सावली येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री रोहित बोम्मावार यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.या वेळी मंत्री बावनकुळे यांनी स्वतः कमळ निशाण असलेला दुपट्टा परिधान करून बोम्मावार यांचा भाजप परिवारात सन्मानपूर्वक प्रवेश घडवून आणला. तसेच “पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला यथोचित सन्मान व संधी दिली जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या जाहीर पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यास श्री रविंद्र शिंदे (अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), आमदार डॉ. मिलिंद नरोटे (गडचिरोली), श्री अशोकजी नेते (माजी खासदार), श्री सुधाकर कोहळे (माजी आमदार), डॉ. नामदेव उसेंडी (माजी आमदार), श्री अशोक जिवतोडे, श्री कृष्णा सहारे यांच्यासह अनेक वरिष्ठ भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. यावेळी सर्वांनी एकमुखाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप- महायुतीला सर्वत्र सत्ता स्थापनेचा निर्धार व्यक्त केला.रोहित बोम्मावार यांचा प्रवेश; सावलीत नव्या राजकीय चर्चांना ऊत, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
रोहित बोम्मावार यांचा भाजपात जाहीर प्रवेश; चंद्रशेखर बावनकुळे व आमदार बंटी भांगडीया यांच्या उपस्थितीत सावलीत भव्य कार्यक्रम!
